सोनेरी चकवा .
सोनेरी चकवा.
अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवला समोर जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ?
असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ...मग मला ते स्वप्नात का दिसते ? म्हणजे ते मेज माझ्याकडे येणार होते म्हणून मला स्वप्न पडले का मला स्वप्न पडले आणि मी ते हुडकायला लागलो म्हणून ते मेज माझ्याकडे आले?
पण या स्वप्नामुळे मी अश्या लाकडी मेजाचा शोध सुरु केला हे मात्र अगदी खरे ! आता मला जरा जुने फर्निचर गोळा करायचा छंद आहे हे तितकेच खरे आहे . पण हे पूर्वी मुनीमजी आपल्या बैठकी समोर ठेऊन मांडी घालून बसत आणि यावर चोपडी ठेऊन त्यात हिशोब लिहित असे मेज पहावे असे मला या स्वप्नामुळे वाटू लागले. मग मी माझ्या ओळखीच्या विक्रेत्यांना मला काय हवे आहे ते समजावून सांगितले. त्याचा एक फोटो सुद्धा त्यांना पाठवला. चार पाच जणांनी मला बोलवून त्यांच्याकडे असलेला मेज मला दाखवले सुद्धा . पण मला काही ते पसंद पडले नाही.
काही दिवसांनी मात्र मला हवे तसे एक लाकडी बैठे मेज मला मिळाले. मोठ्या आनंदाने मी ते घरी आणले आणि माझ्या नेहमीच्या पद्धतीने त्याचे निरीक्षण सुरु केले. खूप जुने आणि सर्व पॉलिश नाहीसे झालेले, एक काळपट रंग सर्व मेजाला आला होता. त्याच्या चारी पायावर कला कुसर केली होती. मध्ये फुगीर भाग आणि खाली निमुळते होत गेलेले चारी पाय मोठे आकर्षक होते. मग थोडा चौकोनी भाग आणि त्यावर वर उचलता येणारे त्या चौकोनी उतरंडीवर असलेले झाकण . त्याचाच त्यावर वही ,कागद ठेऊन लिहिण्यासाठी वापर करता येत असे. मी ते झाकण उचलून पाहिले . आत काही नव्हते पण एक विचित्र खूप दिवस एखादी पेटी बंद करून ठेवल्यावर येतो तसा वास येत होता. आत दोन तीन ठिकाणी शाई पडून झालेले डाग दिसत होते. तसेच डाग बाहेरच्या बाजूला पण होते. वरती हे झाकण जिथून उचलता येई त्याच्या पुढे एक तीन चार इंचाचा सपाट भाग .त्याच्या दोन्ही कडेला शाईची दौत ठेवता येईल अशी गोलाकार खोलगट जागा आणि अगदी कडेला बोरू, टाक किवा पेन ठेवण्या साठी केलेली त्याच आकाराची चरी सारखी जागा. झाकण उघडताना बिजागारीचा कुई कुई असा आवाज होत होता. त्या मेजाच्या बरोबर मध्ये चाकू खुपसून तो परत काढून घेताना व्हावा असा एक लाकडाचा कपटा निघाला होता. ..म्हणजे हा माझा अंदाज.
मग मी ते मेज उचलून बघितले. बरेच वजनदार होते. चांगल्या प्रकारचे लाकूड वापरले असावे. कुणाचे बरे असावे हे मेज ? आणि हा चाकूचा वार कसा काय झाला असावा ? असा विचार करत मी पुन्हा एकदा झाकण वर करून आत निरखून पाहिले .मला तळाशी एक छोटीशी खाच दिसली . कुतूहलाने त्यात बोट घालून मी ती हलवून पाहिली तर थोड्या प्रयत्नाने एक चौकोनी पट्टी एका बाजूला सरकवता येत होती . तशी ती सरकवली आणि मला एक चोरकप्पा दिसला. मग मी जरा ती मेज उजेडात नेऊन पहिले तर मला आत पुस्तका सारखे काहीतरी दिसले. मी मग तो मेज उलटा केला तर त्या चोर कप्य्यातून एक लिफाफा बाहेर पडला आणि एक छोटी रोजनिशी अर्धवट बाहेर आली. मी ती ओढून बाहेर काढली . मी मेज परत सुलट करून ठेवला आणि तो लिफाफा आणि रोजनिशी घेऊन सोफ्यावर बसलो. लिफाफा बराच चुरगळलेला आणि जुनाट वाटत होता. डिंक लाऊन तो चिकटवलेला होता. तो फोडावा का नाही अश्या द्विधा मनस्थितीत असताना मी ती रोजनिशी उचलून उघडली. पहिल्या पानावर कुणाचेच नाव नव्हते पण नंतरच्या पानावर वरती तारीख आणि त्या खाली काही नोंदी दिसल्या.
पहिलीच तारीख होती . १४ ऑगस्ट १९६५. आता २०१८ चालू होते . म्हणजे चक्क ५३ वर्षे मागची ही रोजनिशी होती. बाप रे ! म्हणजे इतके दिवस हि कुणालाच सापडली नसेल ? मग मी तो लिफाफा फोडून आत काय आहे हे पहायचे ठरवले. एका बाजूने नीट कापून मी आतील कागद बाहेर काढला. एकच कागद होता. एका वहीचा फाडलेला कागद. शाईच्या पेनने काही मजकूर लिहिला होता. अक्षर बरे होते पण लिहिणाऱ्या माणसाचा हात बराच कापत असावा. त्या कागदावर खालील मजकूर होता ..मराठीतच होता. त्यावर तारीख नव्हती.
“ हा मजकूर जेव्हा तुम्ही वाचत असाल तेव्हा मी या जगात नसेन. फार विचार करून मी आत्महत्या करायचा निर्णय घेतला आहे. खरे तर माझ्यासारखा माणूस जिवंत असला काय किवा मेला काय ? कुणाला काय फरक पडणार ?
माझ्या मृत्यूचे काही कुणाला फार वाईट वाटायचे कारण नाही . एक वाया गेलेला मनुष्य अशीच माझी ख्याती आहे. मला मूल बाळ नाही आणि पत्नी काही वर्षापूर्वीच या जगातून गेली. सुटली बिचारी. माझ्याकडून तिला नेहमी दुखः आणि मनस्तापच मिळाला. तसा मी एक डॉक्टर होतो. महाराष्ट्रातील एका खेड्यात मी प्रक्टिस करत होतो. मी कोण कुठला वगैरेची मी काहीही माहिती देणार नाही ..खरे तर हे पत्र आणि ही अपशकूनी रोजनिशी कुणाच्या हातात पडू नये म्हणून मी ती या चोर कप्प्यात ठेवली आहे. मी ती जाळून टाकायला हवी होती पण मी यावर इतके काम केले आहे कि ही रोजनिशी जाळायला मला जमले नाही . कुणाला याचा उपयोग झाला तर ? मी एक कमनशिबी आहे ..
पण कुणा नशीब असलेल्या माणसाला सापडली आणि त्याचे जीवनच बदलून गेले तर ?
"As bell metal, when mixed with mercury, is transformed to gold, a person, even though not golden pure, can be transformed into a brāhmaṇa, or dvija, simply by the initiation process." (Hari-bhakti-vilāsa 2.12) Thus if one is initiated by a proper person, he can be accepted as twice-born immediately.
सनातन गोस्वामी यांच्या हरी भक्ती विलास मधील या श्लोकाने माझ्या या प्रवासाची सुरवात झाली ...बेल मेटल वर पाऱ्याची काही प्रक्रिया केली कि त्याचे सोने होते हे मला प्रत्यक्षात आणायचे होते . मग काय सोनेच सोने झाले असते माझ्या कडे ...माझी सगळी गरिबी आणि माझी त्यामुळे आलेली सगळी फरफट थांबली असती ...मालामाल झालो असतो मी .
दहा वर्षे मी यात घातली . माझ्या कडचे सगळे पैसे संपले, राहते घर मी विकून टाकले ..माझी थोडी चालणारी प्रक्टिस पूर्ण बंद पडली ...बायकोचे सगळे दागिने विकले...ती बिचारी खंगून खंगून गेली ...तिच्या औषधासाठी पण पैसे माझ्याकडे राहिले नाहीत .
पण माझा शोध चालूच होता ..अगदी यश मिळतंय असे वाटायचे पण ..मग काही नाही.
मग मला कुणी मांत्रिकाने सांगितले ...एका लहान मुलाचा बळी दिला पाहिजे ..त्याचे रक्त आणि पारा यांचे मिश्रण केले पाहिजे ..मी या साठी एक मुलगा सुद्धा हेरून ठेवला होता. त्या लहान मुलाशी मैत्री सुद्धा केली होती. मोठा गोड मुलगा होता तो .
एक मोठा चाकू सुद्धा मी विकत आणला होता. या चाकूचा प्रहार कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करताना एकदा या मेजावर तो चाकू मी जोरात मारला होता. एक टवका सुद्धा निघाला होता या मेजाचा …
पण बहुदा माझ्या बायकोची पुण्याई असेल कदाचित ..मी सावरलो. स्वताचीच लाज वाटायला लागली ..मी आणखी कोणत्या ठरला जाणार आहे ? ..एक डॉक्टर माणूस ..लोकांचा जीव वाचवणे हे आमचे काम ..तशी आम्ही शपथ घेतो. मी एका निरपराध ,कोवळ्या मुलाला मारायला निघालो? ..
तेव्हा मी मारायचे नाही ..मरायचे ठरवले. ..
माझ्या या प्रवासाचे वर्णन या रोजनिशीत आहे.
माझी ,ज्या कुणाला हे सगळे सापडेल त्याला कळकळीची विनंती आहे ...हे मेज ..हे पत्र आणि हि रोजनिशी जाळून टाका …
एक दुर्दैवी डॉक्टर.”
मी सुन्न होऊन किती तरी वेळ ..त्या पत्रा कडे पहात राहिलो. एक डॉक्टर आपले सगळे जीवन बेल मेटल पासून सोने मिळवण्यासाठी असे वाया घालवू शकतो ?
विज्ञान आणि रसायनशास्त्र याचा अभ्यास केलेला हुषार माणूस ?
खरेच यात काही तथ्य असेल ? छे ! काही तरीच काय ? मी ताबडतोब हे पत्र आणि हि रोजनिशी जाळून टाकतो .
हे मेज सुद्धा ...तोडून मोडून टाकतो .अरे ! म्हणजे हा मला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ होता तर …
मी ती रोजनिशी आणि ते पत्र घेऊन जाळायला निघालो ...पण एक मिनिट ..मी स्वताशीच विचार केला. हि रोजनिशी वाचायला काय हरकत आहे ? मी काही या सोने तयार करायच्या प्रयोगाच्या मागे जाणार नाही ..किती विचारी आणि समतोल माणूस आहे मी . साठी ओलांडली आहे मी. एका सरकारी बँकेतून मोठा अधिकारी म्हणून निवृत्त झालो आहे मी . एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्ने झालीत ..ते दोघेही अमेरिकेत स्थायिक झालेत. मी आणि
माझी बायको इथे पुण्यात अगदी आनंदी जीवन जगत आहोत. मला काय करायचे आता सोने तयार करून ? पण एक कादंबरी वाचतो असे समजून, ही रोजनिशी वाचली तर काय हरकत आहे ? एक दोन महिने नाही तरी बायको अमेरिकेत मुली कडे आणि मुलाकडे गेलीच आहे ..जरा गम्मत म्हणून हि रोजनिशी वाचायला काय हरकत आहे ?
तसे मला सोन्याचे आकर्षण नाही ..पण गुंतवणूक म्हणून मी थोडे सोने जवळ बाळगून आहे ...कधीही नष्ट न होणारा हा एक धातू आहे...किमत वाढत जाणारा .
मग मी ती रोजनिशी उघडली. सुरवातीची तारीख होती. १४ ऑगस्ट १९६५. मी मग एकदम शेवटचे पान बघितले . मागची बरीच पाने कोरी होती . पण शेवटची नोंद होती ती तारीख होती १२ जानेवारी १९७५. म्हणजे त्या पत्रात लिहिले तसे १० वर्षाचा काळ या रोजनिशीत बंद होता. म्हणजे जवळजवळ या डॉक्टरची जीवन गाथाच जणू.
मी मग किचन मध्ये जाऊन एक फक्कड चहा करून आणला. सोफ्या शेजारच्या टिपाय वर चहाचा मग ठेऊन त्याचा स्वाद घेत घेत माझे वाचन सुरु झाले.
“ १४ ऑगस्ट १९६५.
श्रीमद भागवत वाचायचा माझा नेहमीचा नेम होता. दर रविवारी माझे वाचन असे. नाहीतरी आताशा कोणी पेशंट सुद्धा येत नाहीत . त्या मुळे मी केव्हाही भागवत वाचत असे. आज मात्र एक श्लोक नव्यानेच समजला.
“ बेल धातूवर योग्य प्रक्रिया केल्यावर जसे त्याचे सोन्यात रुपांतर होते तसे कोणत्याही जातीत जन्मलेल्या माणसाला जर अधिकारी माणसाकडून दीक्षा मिळाली तर त्याचे ब्राह्मणात रुपांतर होते. ..”
असे सोने तयार करता येईल का ?
इतके दिवस एक कल्पना विलास म्हणून दुर्लक्ष केलेले हे विधान खरे असेल का ? माझ्या सगळ्या समस्या सुटून जातील. मी एकदम श्रीमंत होईन. आज नालायक म्हणून सगळे मला हिणवतात ..अगदी माझी बायको सुद्धा ..त्यांची तोंडे एकदम बंद होतील.
माझा शोध सुरु झाला”
“१८ सप्टेंबर १९६५.
हा मूळ श्लोक सनातन गोस्वामी यांचा आहे . हरी भक्ती विलास या त्यांच्या ग्रंथात आहे. तो ग्रंथ मी आणून त्याची शहानिशा केली . त्या साठी मला पुण्याला जावे लागले. चांगले 20 -३० रुपये खर्च झाले. पण एक लक्षात आले कि हा श्लोक एका अधिकारी माणसांनी लिहिलेला आहे . म्हणजे खरा असणार .
आता पुढचे पाउल म्हणजे ..असे प्रयत्न कुणी केले आहेत का ? त्यांना यश मिळाले आहे का ? हे शोधणे.
पुन्हा पुणे वारी आणि जुनी वर्तमानपत्रे शोधणे ...१० -१२ दिवस जाणार ..खर्च बराच येणार .
कुणा मित्राकडे राहावे का ? का कोणी नातेवाईक ? छे ! मी काय करतो आहे हे कुणालाही समजता कामा नये.
पदरची शिल्लक आणखी कमी होणार ! एखादी स्वस्त धर्मशाळा बरी .”
“ १९ जानेवारी १९६६.
काही सुद्धा सापडत नाही . मराठी वर्तमान पत्रात काहीही सापडत नाही . २/३ चकरा झाल्या पुण्याच्या. मुंबईला Times पहायला जायचे असे ठरवतो आहे. पण हिची तब्येत बरी नाही ...तिला सोडून तरी कसे जावे ?”
“२१ फेब्रुवारी १९६७.
मुंबईच्या २/३ चकरा झाल्या काही सापडत नाही . या विषयावर २/३ लोकांनी पुस्तके लिहिली आहे असे ऐकिवात आहे. पुण्यात आणि मुंबईत अनेक पुस्तकांची दुकाने शोधली. काही नाही .”
“ २३ मार्च १९६८.
सापडले . अगदी ..युरेका ...युरेका …
एक नोंद सापडली. असा प्रयोग झालेला आहे. असे एका इंग्रजी वर्तमान पत्रात नोंद सापडली.
-Delhi .On 27/5/1942 in Birla House in presence of Shri xxxx (xxx xxx xxx sevak sangh), xxxxxxxxxx , xxxxxxChief Engineer, Sri xxxx(A british national ) etc, Pandit xxxxxxx converted one tola mercury into 1 tola gold.He put mercury inside a shell of reetha with some white and yellow powder (Jadi-booti) and it was closed with clay and this was put in hollow of earthen lamp and burnt for 45 minutes.On cooling and opening it, Gold was found! Similar experiment was done in In 1943, pandit xxxxxxx did it in Rishikesh in presence of prominent members of society and others. Mercury provided by xxxx was converted into 18KG of Gold!. This was donated to a trust which fetched Rs 72000”
पण ही मूळ बातमी ज्या वर्तमान पत्रात आली आहे तो काही सापडला नाही . एका जुन्या मासिकात मला हे सापडले. यातील नावे गाळून इथे लिहितो आहे. पण त्या मासिकात जी नावे आहेत ती खूप प्रतिष्ठित लोकांची आहेत .
शंकेला वाव नाही ...जमले आहे आणि हे रहस्य लोकांनी दडपून टाकले आहे.”
“ २८ डिसेंबर १९६८,
आता सोने बनवण्याची पद्धतीचा शोध सुरु केला आहे. यात पारा आणि कुठला तरी धातू बहुदा घंटा करताना वापरतात तो धातू वापरून काही तरी गुप्त पद्धत असावी असे दिसते आहे.
रिषीकेश ला जावे का ? काही मांत्रिकांना सुद्धा गाठले आहे. सापाचे विष उतरवण्याचा काही मंत्र आहे का असे म्हणून वेगवेगळ्या मांत्रिकांशी चर्चा सुरु आहे. बायकोचा आजार घालवायचा आहे असे हि सांगतो आहे. बराच पैसा देऊन सुद्धा हे मांत्रिक काहीही कळू देत नाहीत .
वरच्या बातमीतील जडी बुटी कुठली ते शोधतो आहे.”
वाचता वाचता मी थांबलो . माझा चहा आता गार झाला होता. मी या रोजनिशीच्या वाचनात इतका गुंगून गेलो होतो कि मला चहा प्यावा हेच सुचले नाही . त्या वेळी आजच्या सारखे आंतरजाल ( Internet) नसल्यामुळे यांचे काम आणखीनच अवघड झाले होते. पण या माणसाच्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे . एव्हाना दुपारचे बारा वाजून गेले होते. मी मग बाहेरून जेवण मागवले आणि वाट बघत असताना परत रोजनिशी वाचायला सुरवात केली.
“ २६ मार्च १९६९.
अजून एक मार्ग सापडला. प्राचीन काळी नागार्जुना नावाचा एक रासायनिक होऊन गेला. त्याचा एक ग्रंथ आहे
‘ रस रत्नाकर’ त्यात ह्या सोने बनवण्याच्या विधीची चर्चा आहे असे वाचनात आले आहे. तो ग्रंथ मिळवायला हवा. भांडारकर संस्थेत पाहायला पाहिजे. पुन्हा पुणे दौरा.”
“१३ डिसेंबर १९६८.
नागर्जुनाचा पूर्ण ग्रंथ सापडला नाही . काही मांत्रिकाकडून काही पानांचे उतारे सापडले. पत्नीची तब्येत बिघडत चालली आहे. घरातील सगळे सोने गहाण टाकले आहे. औषधांचा खर्च वाढतो आहे.
नागर्जुनाच्या विधीमध्ये काही तरी चुकते आहे. ब्रिटीश लोकांनी काही श्लोक दडपून टाकले आहेत का ? का काही सांकेतिक गोष्टी मला समजत नाहीत ? एक पिवळसर रंगाचा धातू तयार होतोय ..पण ते सोने नाही . एका सोनाराकडून तपासून पाहिले. फिदी फिदी हसत त्याने सांगितले कि हे पितळ पण नाही . बऱ्याच लोकांना माझा हा उद्योग समजला आहे. लोक आता मला हसत आहेत. माझे कुठे तरी चुकत आहे हे नक्की ..
पण काय चुकते आहे ? स्वर्ण लक्ष्मी मंत्राचा ५१ हजार जप २१ दिवसात करावा असे यल्लाप्पा नावाचा मांत्रिक सांगतो. ”
“ १२ मार्च १९६९
पत्नीचा मृत्यू. सोने करायचा विधी सापडत नाही . आता पुरे झाले हे सगळे असे वाटायला लागले आहे.माझे सारे जीवन वाया गेले आहे. हा यल्लाप्पा बराच माहितगार दिसतो आहे. पण सारखा पैसे मागतो आहे. याला जर सोने करायची विधी माहित असेल तर हा सारखा पैसे का मागतो ? तो म्हणतो योग्य माणसालाच ही विद्या लाभते. माझ्या हातावरील रेषा बघून मी या कामाला योग्य आहे असे तो म्हणतो . खरे असेल का ? आणखी काही दिवस प्रयोग करावे. या प्रयोगात एक खास जडी बुटी लागते ती हिमालयात मिळते असे यल्लाप्पा म्हणतो . हिमालयात जाऊन यावे . ”
तेवढ्यात माझे जेवण आले. जेवण करून मी थोडा वेळ वामकुक्षी केली. पण ती रोजनिशी माझी पाठ सोडत नव्हती . काय झाले असेल त्या अनामिक डॉक्टरचे ?
येवढा प्रयत्न करून सोने तयार करायचा विधी त्याला का सापडत नसेल ? का तो विधी नाहीच .
मग पुढे ३/४ वर्षे बऱ्याच नोंदी रसायनशास्त्रच्या अभ्यासाच्या होत्या. अनेक प्रयोग केले त्याच्या नोंदी होत्या. मग पुढे केव्हातरी यल्लाप्पा मांत्रिकाच्या भेटीच्या नोंदी होत्या. . या मंत्रीकाबरोबर हिमालयात जाऊन येण्याच्या होत्या. पैसा खर्च होत होता. हातात काहीच येत नव्हते.
“२१ डिसेंबर १९७४.
हिमालयातील एका साधूने काही नवे विधी शिकवले.काही जडी बुटी दिल्या. परत आल्यावर करून बघितले पण यश नाहीच. माझ्या हाताला यशच नाही का ?
“ १२ जानेवारी १९७५.
यल्लाप्पा ला एक नवा विधी सापडला आहे . पण त्या साठी थोडी चांदी लागणार आहे. माझ्याकडे एक वडिलाकडून आलेला जमिनीचा तुकडा आहे.तो विकून पैसे उभे केले आहेत . . यल्लाप्पा म्हणतो पारा आणि एका लहान मुलाचे रक्त आणि चांदी हे मिश्रण १ तास उकळून झाले कि सोने तयार होईल ….आत्तापर्यंत गेलेला सगळा पैसा परत येईल …. हे खरे असेल का ? या माणसाने माझ्याकडून बरेच पैसे उकळले आहेत . पण या वेळी हा म्हणतो मी सुद्धा अर्धी चांदी आणतो ...नक्की मिळणार सोने . पण एका लहान मुलाची हत्या ? नाही तर माझे ६ -७ वर्षाचे श्रम वाया जाणार ..पलीकडच्या शेतावरचा गोविंद माझा पेशंट होता. त्याला ५ मुले आहेत. धाकटा राम सुद्धा माझा पेशंट आहे. माझ्याकडे नेहमी येतो . त्याला सारखे काही ना काही होत असते. आमच्या गावाबाहेरील डोंगरात एका गुहेत आमची प्रयोग करायची जागा आहे. ..तिथे या रामला घेऊन जायचे . थोडा क्लोरोफार्म टाकायचा रुमालावर ..
काम फत्ते. एक मोठा चाकू मात्र हवा. ..”
***
या नोंदी नंतर पुढची सर्व पणे कोरी होती. एव्हाना रात्र झाली होती. मी बाहेर जाऊन जेवून आलो. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही . सारखी ती रोजनिशी आठवत होती.
पण मी अस्वस्थ पणे विचार करत होतो ..आपण हा शोध पुढे चालू ठेवावा का ? आता आंतरजालामुळे शोध सोपा झाला आहे.
एक दोन महिने शोध घ्यायला काय हरकत आहे ? आपण जरा वेगळा विचार करू. या डॉक्टरने केलेल्या चुका न करता ...आपण शोध घेतला तर ? १० वर्षाचा न जमलेला शोध आपल्याजवळ आहे . एडिसन ने नाही का १०० पेक्षा जास्त वेळा प्रयोग केले,तेव्हा इलेक्ट्रिक बल्ब चा शोध लागला.
मग ठरले तर आपण हा शोध पुढे सुरु ठेवायचा . पहिल्यांदा एक आपली रोजनिशी सुरु करायची .उद्यापासूनच .
पण आपण प्रयत्न वेगळ्या दिशेने करायचे .
दुसरे दिवशी सकाळीच मी एक रोजनिशी घेऊन आलो.
पहिली नोंद केली .आजची तारीख .
“११ मार्च २०१८.
माझा सोन्याचा शोध.
मग आंतरजालावर खूप शोध घेतला. लक्षात आले कि बऱ्याच लोकांनी यावर काम केले आहे. बऱ्याच नोंदी सापडल्या. प्रयत्न चालू ठेवायला हवा. काही शेअर्स विकून २० लाख रुपये जमा केलेत. काय करायचे नाही हे त्या अनामिक डॉक्टर कडून समजले आहेच. माझ्या संगणकावर एक वेगळे फोल्डर तयार केले आहे. सगळी माहिती त्यात नोंदतो आहे.
“२३ एप्रिल २०१८.”
पारा आहे ८० प्रोटोन तर सोने ७९..पारा आणि सोने यात फक्त १ प्रोटोन चा फरक आहे. पारा घेऊन त्यातून फक्त एक प्रोटोन उडवला तर सोने तयार होणारच . का नाही होणार ?”
“१५ जुलै २०१८.
हिब्रू भाषेत सोने तयार करायची एक गुप्त विधी सापडली आहे म्हणे. ९ अंडी घेऊन ती एका डब्यात ठेवायची .मग तो डबा कचऱ्यात ठेवायचा …...वगैरे.बहुतेक सांकेतिक भाषेत काही तरी असणार .खरे काय आहे हे शोधायला पाहिजे. हिब्रूचा जाणकार शोधायला हवा .
बायको परत आली आहे . माझा हा नवीन उद्योग बघून खूप चीड चीड करते आहे. एक नवा flat भाड्याने घेऊन माझा शोध तिकडे हलवावा असे वाटत आहे.
माझ्या बायकोला काही माझ्या रसायनशास्त्र विषयातील अभ्यासाची कदर नाही ..पैसा सुद्धा खूप जातो म्हणाली.
पण कोटीत पैसे मिळवायचे म्हणजे काही लाख तरी खर्च करावेच लागणार ना ? ”
****
माझा शोध चालू आहे. अनेक प्रश्न पडत आहेत काहीची उत्तरे सुद्धा मिळत आहेत. . आता हा एक नवीन प्रश्न सारखा मला त्रास देतो आहे. बरेच दिवस मला तो प्रश्न पडला आहे. सोने मिळाल्यावर उटी मध्ये बंगला घ्यावा का आपला जवळ खंडाळा मध्येच घेऊन टाकावा ?
********************************************
जयंत नाईक .

Comments
Post a Comment