Posts

Showing posts from May, 2018

The Impossible club. - An Illusion

                                    The impossible club- An Illusion. If you had not heard about the “Impossible” club then   it is not surprising. Only a handful know   about its existence and very few are its members. The members are by invitation only and that too after lot of scrutiny.  of course ... I am a member. This club meets once in a month in a farm house at the outskirts of Pune and Drinks and food are  unlimited and staying arrangement is equal to any five star hotel. After the usual rounds of drinks the meeting starts at 7.30 in the evening and may continue till late at night and the whole day next morning with breaks for food and further drinks.   The purpose of the club is to identify the stories which seem impossible on the face of it and try to find logical ex...

शेवटचा उपाय.

शेवटचा उपाय ... मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच  लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर पिवळ्या आणि गुलाबी रंगाची सुरेख नक्षीकाम केलेली बॉर्डर होती. तशी ती जरा थोराड होती पण अगदी बांधेसूद.सावळा रंग .खांद्यापर्यंत व्यवस्थित बॉब केलेले केस .आज मोकळे सोडलेले नाही तर नेहमी तिचा पोनी टेल असे. ती जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा अजून बरेच लोक रेंगाळत होते .घरी आई वाट बघत असेल हे माहित असल्याने मनीषाने सर्वांचा निरोप घेतला. उज्वलाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ती निघाली . आपली खूप मोठी अशी पर्स तिने खांद्याला लावली. एक छोटेखानी धोपटी होती ती...

तिसरी मिती ...

तिसरी मिती...... प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे. मी ,हा राजेश इनामदार असे करेल असे तरी लोकांनाच काय मला सुध्दा कुठे वाटले होते? एका संस्थानिकांच्या घराण्यात जन्मलेला अगदी बौर्न विथ सिल्वर स्पून!   ... ज्या .. पुण्यात मी जन्मलो आणि वाढलो त्या माझ्या लाडक्या पुण्यातून मी पळून गेलो.... हो अगदी शब्दशः पळून गेलो .नंतर किती तरी वर्षे मी दहा बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस येत नव्हतो.मी शिकायला अमेरिकेत गेलो ,तिथेच M.B.A. केले आणि मग अटलांटात नोकरी.आता तर मी ग्रीन कार्ड होल्डर आहे ...एका अमेरिकन मुलीशी लग्न केले आहे...माझा एक सुंदर बंगला आहे...पण अजूनही पुण्यात यायला माझे मन तयार होत नाही. ...माझे आई वडील सुद्धा मला भेटायला अमेरिकेतच येतात....एकमेव बहिण आहे ती ..लंडन ला ..... बराच मोठा मित्र परिवार आहे पुण्यात पण ......अजूनही मन पुण्यात जायला धजावत नाही ..... प्रेमासाठी  कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे असे जे मी म्हणतो ....त्याला बरीच कारणे आहेत........... आणि एवढे सगळे करून खरे प्रेम मिळते की नाही कुणास ठाऊक ?... ****** दहा बारा वर्षापूर्वीचा काळ ... म...

तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या!

तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या! नदीच्या च्या काठी ,घाटावर नेहमी वर्दळ असे. घाटाच्या थोडे पुढे एक दत्ताचे पुरातन देऊळ होते. सकाळ संध्याकाळ आरतीचे आणि घंटेचे आवाज आसमंतात भरून जात असत. देवळात गेले कि मोठे प्रसन्न वाटे. देवळाच्या शेजारीच एक उंबराचे झाड होते. ते सुद्धा त्या मंदिरासारखेच पुरातन होते. कदाचित मंदिरापेक्षा जास्त पुरातन असावे. त्या झाडाभोवती बसण्यासाठी एक पार कुणीतरी बांधला होता. तो मात्र नुकताच कुणी तरी बांधला असावा. आज त्या पारावर एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समोर त्यांचे सात आठ भक्त गण बसलेले होते. स्वामीजी मोठ्या गोड आवाजात भगवत गीतेवर काही भाष्य करत होते. त्यांचे शिष्यगण मोठ्या आदराने प्रवचन ऐकत होते. “ आत्मा हा अमर आहे,अविनाशी आहे.त्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही ,त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. चराचरात तोच व्यापून आहे.  हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. पण याचा आपल्याला अनुभव यायला हवा. तरच ते सत्य.नाहीतर नुसते सगळे पढत पंडित. आपल्या सर्व प्राणीमात्रात एकच आत्मा आहे याचा अनुभव घ्या!  सगळी कडे ब्रम्ह व्यापून आहे हे जाणून घ्या. त्याचा अनुभव घ्या. नुसत...

रोहनची परीक्षा ..

                  रोहनची परीक्षा आज रोहनचा दिवस खूप गडबडीचा होता. तसा त्याचा प्रत्येक दिवसच गडबडीचा असतो.सकाळी आईबाबा ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत त्याची आंघोळ वगैरे होऊन त्याचा ब्रेकफास्ट चालू असतो .आताशा तो आपली आपण आंघोळ करतो आणि आपले कपडे पण घालतो. मग त्याचे बाबा त्याला शाळेत सोडतात.दुपारी शाळा सुटली कि तो रिक्शाकाकांबरोबर डे केअर मध्ये जातो. दुपारचे जेवण तिथल्या मावशीच देतात. मग संध्याकाळी रिक्षा काका त्याला खेळाच्या मैदानावर   सोडतात. हि त्याची खूप आवडीची जागा! त्याला तिथे खूप हुंदडायला मिळते. तो मैदानावर खूप खूष असतो. मग सहा वाजता त्याची आई येऊन त्याला घरी घेऊन  जाते. असा त्याचा खूप धावपळीचा दिवस असतो…….. पण आजचा दिवस वेगळाच होता. आज त्याचे आई आणि बाबा या दोघांनीही रजाघेतली होती. त्याच्या आईबाबांनी सकाळपासून त्याला भंडावून सोडले होते!आज एका शाळेत त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणे! तो आता पहिलीत या नव्या शाळेत जाणार होता. खरंम्हणजे तो सध्या जात असलेली शाळा त्याला खूप आवडत होती. त्याला तिथे खूप मित्र मैत्रिणी होत्या.पण त्याच्य...

न्याय – कलियुगातला.

                      न्याय – कलियुगातला. स्थळ: सम्राट सूर्यकेतू यांचा दरबार. काळ: इंग्रजांचे भारतात राज्य यायच्या थोड्या आधीचा काळ. सम्राट सूर्यकेतू  गंभीर पणे न्यायाधीश राजकुमार रवीन्द्रना म्हणाले, “ राजकुमार आपली न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यापासून येव्हडा सर्वाना संभ्रमित करणारा विवाद  समोर आला नव्हता..    काल आपण वादी आणि प्रतिवादी  या दोघांची बाजू ऐकून घेतली. दोन्ही  बाजूंच्या साक्षी पण संपल्या आहेत. आता आपण निर्णय देण्याची वेळ आली आहे.  सारा दरबार आपल्या निर्णयाची वाट पहात आहे.तेव्हा या राज्याचे न्यायाधीश म्हणून या विवादाचा  आपण न्याय करावा.आपल्या मते इथे सादर केलेल्या पुराव्यानुसार, प्रधानजी सत्यव्रत  यांनी प्राजक्ता नावाच्या कन्येला पळवून नेले , तिला आपल्या शेतातील वाड्यावर डांबून ठेवले, आणि तिच्याबरोबर गैरव्यवहार केला  हा आरोप सिद्ध झाला आहे का? “ राजकुमार रवींद्र एक विचारी,न्यायप्रिय आणि हुशार न्यायाधीश म्हणून थोड्याच दिवसात सर्वदूर प्रसिद्ध झाले होते.त्यांनी न्यायाशास...

भित्यापाठी ...आणखीन भिती....

भित्यापाठी ...आणखीन भिती.... पोटभर  खायला मिळाले कि किती समाधान असते हे भिक्याला आज बरेच दिवसांनी अनुभवाला आले. भिक्याला आज सगळे जग एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागले. आज थोड्या वेळापूर्वीच एका उकिरड्यावर त्याला एक प्लास्टिकचा डबा सापडला होता. त्यात कुणीतरी चार पाच इडल्या टाकून दिल्या  होत्या....थोडा वास येत होता पण भिक्याला खाता आल्या..त्याचे पोट एकदम भरून गेले. ..... या पोटाची योजना या देवाने काही बरोबर केलेली नाही असे भिक्याला नेहमी वाटायचे.दररोज एकदा  तरी , ही पोटाची खळगी भरायला लागते हे काही बरोबर नाही.... ....एकदा भरली कि कमीत कमी आठ दहा दिवस तरी ,परत ती भरायला लागली नाही तर किती मस्त झाले असते. ....आपल्याला दररोज अशी भिक तरी मागावी लागली नसती.येवढे सगळे करून दररोज पोट काही भरत नाही ते वेगळेच.भिक्याच्या डोक्यातून अशा काहीतरी वेगळ्याच कल्पना निघत असत.थोडे शिकायला मिळाले असते तर हा रेल्वेत गार्ड तरी नक्की झाला असता ....असे त्याच्या काही भिकारी मित्रांना वाटे.... गार्ड ची काय शान असते! त्याचा तो पांढरा शुभ्र कोट ,ती कसला तरी बिल्ला लावलेली टोपी...