Posts

Showing posts from 2018

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

नखरेल नयना आणि तिचा प्रताप .. नखरेल नयना ...उद्यम वाडीतील झोपडपट्टी मधल्या आपल्या घरातून नेहमीसारखी झोकात बाहेर पडली. आज तिने गुलाबी लहान लहान रंगाची फुले असलेला top घातला होता ...आपली बरीचशी पाठ उघडी राहील असा top तिने मुद्दाम शिवून घेतला होता ,आणि  त्या खाली आज तिने निळसर रंगाची घट्ट जीन घातली होती . खांद्यापर्यंत नीट कापलेले केस तिने आज मोकळेच सोडले होते. कपाळावर गुलाबी रंगाची मोठी टिकली आणि ओठावर हलकेसे पण भडक रंगाचे लिपस्टिक. आपली कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी हलवत ती बाहेरच्या कच्च्या   रस्त्यावर आली. आपल्याकडे कोणी बघतंय कि नाही याचा तिने जरा अंदाज घेतला. रस्त्यावर आत्ता कोणीच नव्हते. तिची जरा निराशाच झाले. पण तिला माहित होते कि पाच दहा मिनिटे चालत गेले कि डाव्या बाजूला झाडाखाली तीन चार चहाच्या ..विडी काडी आणि वडापाव विकणाऱ्या टपऱ्या होत्या. तिथे बरीच वर्दळ नेहमी असायची . बरीच तरूण मुले काही आपल्या मोटार सायकल वर किवा तिथल्या बाकड्यावर बसून टिवल्या बावल्या करत असतात.  नयना रस्त्यावरून निघाली की त्यांच्या नजरा तिच्या सर्वांगावरून फिरत. एक दोन जण हळू...

The impossible club- Saved by the daughter..

The impossible club- Saved by the daughter..   In my last narrative I had   Introduced you to The Impossible club. If you had not heard about the “Impossible” club then  it is not surprising. Only a handful know  about its existence and very few are its members. The members are by invitation only and that too after lot of scrutiny. Now you are one of the lucky few who know about the working of this club. Today I am going to introduce you to very touching but unexplainable event that happened in the life of one of the members of our club. Mrs. Rajani Tamhane. Who is a managing director of a large construction company called  Rajani Construction and is also associated with various schools for girls which were started by her father. As usual we met for our monthly meeting  in a farm house at the outskirts of Pune and  after various rounds of drinks and consuming the  delicious food ,the meeting was started. As I explained in my last...

स्पर्श ...तसाही आणि असाही ..

 स्पर्श ...तसाही आणि असाही .. मी  परत एकदा बँकेच्या पासबुकात निरखून बघितलं . फाईल मधल्या सगळ्या ठेवींच्या नोंदी बघितल्या.परत एकदा कागदावर केलेली आकडेमोड तपासून बघितली. पुढच्या तीन महिन्यांचे होणारे खर्च आईकडून तपासून घेतले. मला आपला रक्तदाब एकदम वाढलाय कि काय असे वाटायला लागले.  हृदयातील धडधड एकदम मला स्वतःलाच एकू यायला लागली आहे ,असे वाटायला लागले. .... गेले २/३ तास माझा  आणि माझ्या  आईचा प्रयत्न चालला होता  कि महिन्याचा खर्च कमी कसा करता येईल?दुधाचे बिल,वाण्याचे सामान,वीज ,बस चा खर्च,मोबाईल  चे बिल,सोसायटी चार्जेस , पेट्रोल चा खर्च सगळे विचारात घेतले होते. वर्तमान पत्र बंद केले होते.घरकामाला येणाऱ्या बाईला या एक तारखेपासून येऊ नको असे सांगितले होते. माझ्या  कॉलेजची फी अगोदरच भरली होती.सगळे सगळे विचारात घेतले होते. .... कितीही बचत केली ,सर्व बँकेतील ठेवी मोडल्या तरी एकच उत्तर येत होते. आमच्या  कडचे सर्व पैसे ३ महिन्यानंतर  संपणार होते. त्या नंतर काय? आमचा  उदरनिर्वाह कसा होणार होता? घराचे हप्ते विम्याच्या पैश्यातून पूर्ण भरले...

The Impossible club. - An Illusion

                                    The impossible club- An Illusion. If you had not heard about the “Impossible” club then   it is not surprising. Only a handful know   about its existence and very few are its members. The members are by invitation only and that too after lot of scrutiny.  of course ... I am a member. This club meets once in a month in a farm house at the outskirts of Pune and Drinks and food are  unlimited and staying arrangement is equal to any five star hotel. After the usual rounds of drinks the meeting starts at 7.30 in the evening and may continue till late at night and the whole day next morning with breaks for food and further drinks.   The purpose of the club is to identify the stories which seem impossible on the face of it and try to find logical ex...

शेवटचा उपाय.

शेवटचा उपाय ... मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच  लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर पिवळ्या आणि गुलाबी रंगाची सुरेख नक्षीकाम केलेली बॉर्डर होती. तशी ती जरा थोराड होती पण अगदी बांधेसूद.सावळा रंग .खांद्यापर्यंत व्यवस्थित बॉब केलेले केस .आज मोकळे सोडलेले नाही तर नेहमी तिचा पोनी टेल असे. ती जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा अजून बरेच लोक रेंगाळत होते .घरी आई वाट बघत असेल हे माहित असल्याने मनीषाने सर्वांचा निरोप घेतला. उज्वलाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ती निघाली . आपली खूप मोठी अशी पर्स तिने खांद्याला लावली. एक छोटेखानी धोपटी होती ती...

तिसरी मिती ...

तिसरी मिती...... प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे. मी ,हा राजेश इनामदार असे करेल असे तरी लोकांनाच काय मला सुध्दा कुठे वाटले होते? एका संस्थानिकांच्या घराण्यात जन्मलेला अगदी बौर्न विथ सिल्वर स्पून!   ... ज्या .. पुण्यात मी जन्मलो आणि वाढलो त्या माझ्या लाडक्या पुण्यातून मी पळून गेलो.... हो अगदी शब्दशः पळून गेलो .नंतर किती तरी वर्षे मी दहा बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस येत नव्हतो.मी शिकायला अमेरिकेत गेलो ,तिथेच M.B.A. केले आणि मग अटलांटात नोकरी.आता तर मी ग्रीन कार्ड होल्डर आहे ...एका अमेरिकन मुलीशी लग्न केले आहे...माझा एक सुंदर बंगला आहे...पण अजूनही पुण्यात यायला माझे मन तयार होत नाही. ...माझे आई वडील सुद्धा मला भेटायला अमेरिकेतच येतात....एकमेव बहिण आहे ती ..लंडन ला ..... बराच मोठा मित्र परिवार आहे पुण्यात पण ......अजूनही मन पुण्यात जायला धजावत नाही ..... प्रेमासाठी  कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे असे जे मी म्हणतो ....त्याला बरीच कारणे आहेत........... आणि एवढे सगळे करून खरे प्रेम मिळते की नाही कुणास ठाऊक ?... ****** दहा बारा वर्षापूर्वीचा काळ ... म...