सोनेरी चकवा .
सोनेरी चकवा. अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवला समोर जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ? असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ...मग मला ते स्वप्नात का दिसते ? म्हणजे ते मेज माझ्याकडे येणार होते म्हणून मला स्वप्न पडले का मला स्वप्न पडले आणि मी ते हुडकायला लागलो म्हणून ते मेज माझ्याकडे आले? पण या स्वप्नामुळे मी अश्या लाकडी मेजाचा शोध सुरु केला हे मात्र अगदी खरे ! आता मला जरा जुने फर्निचर गोळा करायचा छंद आहे हे तितकेच खरे आहे . पण हे पूर्वी मुनीमजी आपल्या बैठकी समोर ठेऊन मांडी घालून बसत आणि यावर चोपडी ठेऊन त्यात हिशोब लिहित असे मेज पहावे असे मला या स्वप्नामुळे वाटू लागले. मग मी माझ्या ...