Posts

Showing posts from February, 2020

जगावे का मरावे ?

जगावे का मरावे ? (ही कथा  डिसेंबर २०१९ च्या जेष्ठपर्व या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. . विवेक मासिकाचे सह प्रकाशन .)   लेखक . ( असे म्हणतात कि लेखक वेगवेगळ्या पद्धतीने तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतो . म्हणजे त्याला भेटलेली माणसे ,त्याने अनुभवलेले प्रसंग ..त्या वेळी त्याच्या मनात उमटलेल्या भावना तो वेगवेगळ्या कथेत मांडत असतो,सांगत असतो. मी शिकत असताना एका आजोबा आणि त्यांची बायको ..माई . यांच्या  बंगल्यात अभ्यास करण्यासाठी  खोली घेऊन रहात होतो. . ते दोघेच रहात. त्यांची जगण्यासाठी चाललेली निरर्थक धडपड मला पावलोपावली दिसत होती. मनाला उभारी नव्हती ..शरीर साथ देत नव्हते . पण जगणे संपत नव्हते.  मी त्यांची खोली सोडून आपल्या मार्गाला लागलो..त्यांचा सहवास सुटला तरी मनात कुठे तरी ते घर करून होतेच … मग एके दिवशी अचानक ते माझ्या या कथेतच आले . ) ************ “ आजोबा ...आजोबा  उठा उठा ..आज तुम्ही मला आपले शेत दाखवायला नेणार  होतात ना ? उठा उठा …” “ हो रे बाबा उठतो उठतो . पण आता ते आपले शेत राहिले नाही ..आपण विकले आहे ते ...” असे म्हणत आजोबा उठले. त्यां...