रोहनची परीक्षा.
रोहनची परीक्षा आज रोहनचा दिवस खूप गडबडीचा होता. तसा त्याचा प्रत्येक दिवसच गडबडीचा असतो.सकाळी आईबाबा ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत त्याची आंघोळ वगैरे होऊन त्याचा ब्रेकफास्ट चालू असतो .आताशा तो आपली आपण आंघोळ करतो आणि आपले कपडे पण घालतो. मग त्याचे बाबा त्याला शाळेत सोडतात.दुपारी शाळा सुटली कि तो रिक्शाकाकांबरोबर डे केअर मध्ये जातो. दुपारचे जेवण तिथल्या मावशीच देतात. मग संध्याकाळी रिक्षा काका त्याला खेळाच्या मैदानावर सोडतात. हि त्याची खूप आवडीची जागा! त्याला तिथे खूप हुंदडायला मिळते. तो मैदानावर खूप खूष असतो. मग सहा वाजता त्याची आई येवून त्याला घरी घेऊन जाते. असा त्याचा खूप धावपळीचा दिवस असतो. पण आजचा दिवस वेगळाच होता. आज त्याचे आई आणि बाबा या दोघांनीही रजाघेतली होती. त्याच्या आईबाबांनी सकाळपासून त्याला भंडावून सोडले होते!आज एका शाळेत त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणे! तो आता पहिलीत या नव्या शाळेत जाणार होता. खरंम्हणजे तो सध्या जात असलेली शाळा त्याला खूप आवडत होती. त्याला तिथे खूप मित्र मैत्रिणी होत्या.पण त्याच्या ...