आनंदाचे झाड .
आनंदाचे झाड.
कोरेगावपार्क मधील आमच्या बंगल्याच्या समोर एक लहानसे मोकळे मैदान आहे. त्याच्या मध्यभागी एक बरेच जुने वडाचे झाड आहे.त्याच्या खोडाभोवती बऱ्याच पारंब्या चारी बाजूला पसरल्या आहेत. त्या पारंब्यांनी जणू त्या झाडाभोवती एक संरक्षक तटबंदीच केली आहे असे वाटते.मी घरी असेन तेव्हा ,किवा ऑफिसमधून येताना किवा जाताना मला या झाडाकडे पहात राहायला खूप आवडते.त्या डेरेदार वृक्षाची ती हिरवीगार पाने,त्या पारंब्या मला खूप मोहित करतात.आमचा एखादा पूर्वजच इथे या झाडाच्या रूपाने आला आहे आणि मला किवा आमच्या कुटुंबातील सर्वाना आशीर्वाद देत आहे असे मला नेहमी वाटते......मी बाहेर येताच त्याची पाने सळसळ करतात...... काही वेळा तर त्याची नुकतीच उमललेली मऊसूत लालसर गुलाबी पाने माझ्याकडे बघून हसतात......माझे मन मग एकदम आनंदीत होते. प्रफुल्लीत होते.
मी सुद्धा ,मग मनातल्या मनात त्या वृक्षाला नमन करतो.त्याला सुद्धा ते समजते .......
त्या झाडाखाली मी एक सिमेंटचा बाक ठेवला आहे. त्या झाडाच्या गर्द सावलीत बसून माझे आवडते पुस्तक वाचायला किवा संगीत ऐकत बसायला मला खूप आवडते.....
एखाद्या प्रेमळ वडिलधाऱ्या व्यक्ती शेजारी बसून त्यांच्याशी गप्पा मारल्यासारखे वाटते मला.
माझ्या पाठीवरून त्यांचा सुरकुतलेला हात हळुवारपणे फिरतो आहे असे उगीचच वाटते.
...... माझी बायको अस्मिता माझी यावरून खूप चेष्टा करते.म्हणते बायको पेक्षा याला हे झाड जास्त प्रिय आहे.
मी त्याला आमचे आनंदाचे झाड म्हणतो......
मला नेहमी वाटते कि आनंद होण्यासाठी ,काही घडायला किवा काही मिळवायला कशाला पाहिजे?.....अश्या या झाडाचे तुमच्या जीवनातील केवळ अस्तित्व तुमच्या जीवनात आनंदाचे कारंजे थुई थुई उडवू शकते.......
माझ्या वडिलांनी बांधलेला हा बंगला थोडा आतल्या बाजूला आणि रस्त्याच्या शेवटी होता. शेजारी आणखीन एक जाधवांचा बंगला आणि समोर मोकळी जागा आणि हे आनंदाचे झाड.
आता आई वडील दोघेही नाहीत पण त्यांच्या खूप आठवणी आहेत या जागेत.....आमच्या बालपणीच्या सुद्धा.....
एका रविवारी मी बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसून चहा घेत होतो.माझी बायको अस्मिता शेजारच्या खुर्चीवर वर्तमानपत्र वाचत बसली होती. तेवढ्यात बाहेर एक अलिशान ऑडी थांबली. त्यातून एक काळसर रंगाचा सूट आणि तशाच रंगाचा टाय घातलेली रुबाबदार व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती उतरली.आमच्या गेटपाशी येऊन त्यानी मोठ्या आदबीने मला विचारले,
“ दाते साहेब ,तुमचा थोडा वेळ घेऊ का ? मी राजाराम बिल्डर्स चा कार्यकारी अधिकारी आहे. कालच दुपारी मी तुम्हाला फोन केला होता.”
असे बरेच लोक माझ्या मागे लागले होते हा बंगला विका म्हणून.मी सौम्यपणे त्यांना नकार देत असे. यांना मी काल फोन वर सुद्धा हेच सांगितले होते. पण हे असे घरापर्यंत येतील असे मला वाटले नव्हते.
“ हे पहा मी तुम्हाला काल फोन वर सांगितले आहे ,मला हा बंगला विकायचा नाही” मी खुर्चीतून उठून गेट पर्यंत गेलो आणि त्यांना स्पष्ट सांगितले. मला आपली रविवारची सकाळ बरबाद करायची नव्हती.
“ तुम्ही फक्त आमचे प्रपोझल ऐकून घ्या! मी फक्त १० मिनिटे मागतोय ,शेवटी निर्णय तुमचा आहे.पण ऐकायला काय हरकत आहे? नाही तर तुम्ही अगोदरच सांगितले आहे....वहिनीसाहेब पण विचार करतील. . ....”
मी नाखुषीनेच त्यांना आत बोलावले.
आत येत त्यांनी माझ्या हातात त्यांचे कार्ड दिले.
“ मी राघव मिराशी.वाहिनी साहेब आणि दाते साहेब मी आपला जास्त वेळ घेणार नाही.आपली निराशा ही करणार नाही....”
मिराशीनी मला सांगितले कि आमच्या शेजारच्या जाधवांनी त्यांचा बंगला विकायचे ठरवले आहे , समोरची जागा आणि आमचे दोन बंगले मिळून राजाराम बिल्डरना या जागेत एक मोठे श्रीमंती apartment बांधायचे आहे.
“ आम्ही तुम्हाला ५ बेडरूमचे २ flat देऊ.शिवाय तुमच्या ३ पिढ्या बसून खातील एव्हडे पैसे देऊ.... फार सुंदर आणि generous प्रपोझल आहे ,दाते साहेब!’
“ तुमचे खूप धन्यवाद ,पण मला हा बंगला विकायचाच नाही.आपण जाऊ शकता.” मी जरा चिडलोच होतो. हे बिल्डर लोक फार म्हणजे फारच चिकट असतात.
“ दाते साहेब ,तुम्ही लगेच निर्णय घेऊ नका. आमच्या प्रपोझलचा पूर्ण विचार करा. वाहिनीसाहेबांशी बोला,तुमच्या दोन्ही मुलांशी बोला. मी पण थोडा विचार करतो.माझे नवे प्रपोझल तुम्हाला पाठवतो.....please जरा शांतपणे विचार करा.” असे सांगून मिराशी गेले. मी आणि अस्मिता खूप अस्वस्थपणे बसून राहिलो खूप वेळ. मी एका परदेशी कंपनीत मुख्य अधिकारी होतो,अस्मिता dentist होती.आमची दोन्ही मुले कॉलेजमध्ये शिकत होती. आम्हाला पैश्यापेक्षा हा बंगला प्रिय होता. आम्हाला विकायचा नाही असे सांगून सुद्धा हे लोक माझी पाठ का सोडत नव्हते? त्यात या शेजारच्या जाधवांनी त्यांचा बंगला विकायचा ठरवला म्हणे. आता हे लोक आमच्यावर जास्त दबाव आणणार!
“ अस्मिता ,मी त्या शेजारच्या जाधवांशी बोलून येतो.” मी अस्मिताला म्हणालो.
जाधव माझ्यापेक्षा वयस्क होते. ते आणि जाधव वाहिनी दोघेच या बंगल्यात होते. त्यांची दोन्ही मुले परदेशात होती.
जाधव खूप खुशीत होते. नाहीतरी एवढा मोठा बंगला सांभाळणे त्यांना अवघड जात होते. त्यांना हे प्रपोझल खूप आवडले होते.
“ दाते साहेब ,फार विचार करू नका! तुम्हीही विकून टाका ! असे प्रपोझल पुन्हा येणार नाही !”
जाधव मला म्हणाले.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मला भेटायला एक तरुण मुलगी आली या राजाराम बिल्डर्स कडून.तिने खूप रंगीत फोटो असलेले एक मोठे पुस्तकच माझ्या हातात ठेवले.
“ हे आमचे नवीन प्रपोझल ! आमच्या आतापर्यंतचे यशस्वी प्रोजेक्ट बद्दल माहिती आणि फोटो आहेत यात.”
अतिशय भडक मेकअप केलेली ती तरुण मुलगी ,सारखा आपला पदर पाडत माझ्याशी लाडे लाडे बोलायचा प्रयत्न करत होती.
मी तिला ताबडतोब माझ्या कॅबिनच्या बाहेर काढली.
“ Thank you sir!” असे म्हणत , आपल्या डोळ्यांच्या खोट्या पापण्या उगीचच उघडझाप करत ती आपले सर्वांग नखरेल पणे हलवत निघून गेली.
मी सुटकेचा निश्वास टाकला.
काय हे? या मुलींचे आईबाप यांना काहीच कसे बोलत नाहीत?
मग चार पाच दिवस काहीच झाले नाही . मला अशी खोटी आशा होती कि या लोकांनी माझा नाद सोडला आहे. ...
पाच दिवसानी संध्याकाळी मी ऑफिसमधून नुकताच आलो होतो. मी आणि अस्मिता गप्पा मारत बसलो होतो. आमची दोन्ही मुले अजून आली नव्हती . तेवढ्यात आमच्या बंगल्याचे फाटक उघडल्याचा आवाज आला.दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडले तर ,मिराशी आणि त्यांच्याबरोबर आणखी एक गृहस्थ होते.
“ फक्त ५ मिनिटे घेतो तुमची साहेब.हे आमच्या फर्म चे मालक आहेत. वर्धमान साहेब. यांना आपल्याशी ५ मिनिटे बोलायचे आहे.” मिराशी म्हणाले.त्यांनी पूर्वीचाच सूट घातला होता. पण आज टाय भडक पिवळ्या रंगाचा होता. वर्धमान साहेबांनी पांढऱ्या रंगाचा खादीचा कुर्ता आणि खाली त्याच रंगाची सुरवार घातली होती. त्यांच्या डाव्या हाताच्या पाची बोटात वेगवेगळे खडे असलेल्या अंगठ्या होत्या.गळ्यात ५/६ सोन्याच्या चेन त्यांनी घातल्या होत्या.कसलातरी उग्र वासाचा सेंट त्यांनी फवारला होता. ते आत यायच्या आधी तो उग्र वास आमच्या दिवाणखान्यात पसरला.
“ या ! मला हा बंगला विकायचा नाही ,हे मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे! तुम्ही परत परत विचारून माझे उत्तर बदलणार नाही.” मी दरवाज्यातूनच म्हणालो.
“ फक्त ५ मिनिटे. या आम्ही लगेच जाऊ.” आता वर्धमान साहेब म्हणाले. मला हा गृहस्थ अजिबात आवडला नाही.
“आत या!” मी माझ्यावर कुणी तरी सक्ती केली आहे असे म्हणालो. ते दोघे आत आले. वर्धमान साहेबांनी आपले बूट बाहेर काढले आणि ते मिराशीना म्हणाले,
“ मिराशी ! सज्जन माणसाचे घर आहे.बूट बाहेर काढा!”
“ चुकलो साहेब !” मिराशी खाली मान घालून म्हणाले.त्यांनी बूट बाहेर काढले.
सोफ्यावर बसल्यावर वर्धमान साहेब आपले काजळ घातलेले डोळे माझ्यावर रोखत म्हणाले.
“ दाते साहेब. आपला बंगला खूप सुंदर आहे. आणि वाहिनीसाहेबानी तो सुरेख ठेवला आहे”
“ धन्यवाद ,” मी काही तरी बोलायचे म्हणून म्हणालो. अस्मिता सुद्धा अस्वस्थ दिसत होती.
“ आम्ही आमचे प्रपोझल पुन्हा तपासले आहे. आम्ही तुम्हाला अजून एक कोटी रुपये आमची सदभावना म्हणून द्यायला तयार आहोत.” वर्धमान साहेब म्हणाले .
“ वर्धमान साहेब ! मी किती वेळा तुम्हाला सांगू ? मला बंगला विकायचा नाही. आमच्या वडिलांनी बांधलेले हे घर आम्हाला पाडायचे नाही.”
“ दाते साहेब. अगदी बरोबर आहे तुमचे.वडिलांच्या आठवणी महत्वाच्या. आपण असे करू या apartment ला आपल्या वडिलांचे नाव देऊन टाकू. मी फार समजूतदार माणूस आहे . तुमच्या आणखी काही मागण्या असतील त्या पण आपण पूर्ण करू.मी फार समजूतदार माणूस आहे.”
“ I am sorry. माझा निर्णय बदलणार नाही”
“ अहो साहेब ,आम्ही किती वेळा तुम्हाला सांगतोय कि आम्हाला हा बंगला विकायचा नाही म्हणून.” आता अस्मिता म्हणाली.
“ वाहिनी साहेब जरा समजुतीने घ्या. मला जरा पाणी मिळेल का ?” वर्धमान साहेब म्हणाले.
अस्मिता आत गेली. वर्धमान साहेबांनी आपल्या खिशात हात घातला आणि खिशातून एक काळ्याभोर रंगाचे पिस्तुल काढले. ते माझ्यावर रोखत ते म्हणाले,
“ वहिनीसाहेब नाहीत तेवढ्यात तुम्हाला एक प्रश्न विचारतो .तुम्हाला गोळी खायची आहे का मी देतो ते पैसे हवे आहेत?”
माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. घश्याला कोरड पडली ....आपल्याला चक्कर येती आहे असे मला वाटले! चित्रपटात दिसणारे पिस्तुल वेगळे आणि असे प्रत्यक्षात आपल्या समोर आलेले वेगळे ....आणि ते सुद्धा माझ्या छातीवर रोखलेले......
“माझे खूप वर पर्यंत हात पोचले आहेत. पोलिसांकडे जायचा विचार करू नका.ते माझ्या खिशात आहेत. ...टोकाची भूमिका घेऊ नका आणि मलाही घ्यायला लावू नका ....” असे म्हणत वर्धमान साहेबांनी पिस्तुल परत आपल्या खिशात ठेवले.
मला स्वतःची लाज वाटली.माझ्या सारख्या सभ्य माणसाच्या घरात येऊन ,हा पांढरे कपडे घातलेला ,सभ्यतेचा मुखवटा घातलेला घाणेरडा माणूस मला पिस्तुल दाखवतो आणि मी त्याला काहीही करू शकत नाही !.....याच्याकडे सत्ता आणि पैसा दोन्ही आहे म्हणून?
मला स्वतःची ,ज्या देशात असे छुपे गुंड उजळ माथ्याने मिरवतात त्या देशाची .....माझ्या शंडपणाची...... प्रचंड लाज वाटली.
मला या माणसापुढे सपशेल शरणागती पत्करावी लागणार हे सत्य स्वीकारून , माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी, मी आलेल्या प्रसंगाला शरण गेलो.......उसने हसू तोंडावर आणून !
तेवढ्यात अस्मिता पाण्याचा ग्लास घेऊन आली. तो घेऊन वर्धमान साहेबांनी तो माझ्या हातात दिला.
“ दाते साहेब घ्या पाणी प्या. अहो मी खूप समजूतदार माणूस आहे..... आपण परत एकदा माझे प्रपोझल वाचा.आपण हे दोन्ही बंगले पाडू आणि या समोरचे झाड पाडून हे छोटे मैदान पण वापरू !..... अप्प्रोच रोड मोठा करायचा तर हे झाड पाडायला लागणार....एकदम धडाकेबाज स्कीम करू. त्याला तुमच्या बाबांचे नाव देऊ . परत एकदा वाचा हे प्रोपोझल .... तुम्हाला सर्वाना ते नक्की आवडेल ...... तुमच्या वकिलाला दाखवा.... वहिनीसाहेब,तुम्हा सर्वांचे अभिनंदन ...... दातेसाहेब आमच्या प्रपोझलचा परत विचार करायला तयार झाले आहेत. ” वर्धमान साहेब म्हणाले.अस्मिता एकदम गोंधळून गेली . मी फक्त नजरेने तिला शांत रहा असे खुणावले.
“ ते सगळे ठीक आहे ,मी विचार करतो पण ...... म्हणजे हे वडाचे झाड पाडणार? .... एवढे जुने झाड.... ते नाही पाडले तर चालणार नाही का? ....” मी चाचरत विचारले.
अस्मिता गोंधळून माझ्याकडे पहात राहिली. इतका वेळ नाही म्हणत असलेला आपला नवरा एकदम या प्रपोझलचा विचार करायला कसा काय तयार झाला हे तिला कळेना.मला तिला सगळे खरे खरे सांगावे लागणार.
“ एका वडाच्या झाडाचे काय घेऊन बसलात दातेसाहेब? आता तुमच्या दारात पैशाचे झाड आले आहे.त्याचे खुल्या दिलाने स्वागत करा.” वर्धमान साहेब हसत हसत म्हणाले.
“ वर्धमान साहेब ,हे झाड तोडायला लागणार नाही असे काही करता येईल का? मला हे झाड फार प्रिय आहे....” मी परत म्हणालो.
“ मी प्रयत्न करतो ,पण तुम्ही आता या झाडाची काळजी करू नका.तुम्ही तुमच्या पैशाचे झाड लावायची तयारी करा!....” वर्धमान साहेब हसत म्हणाले.....आता ते खूप खुष दिसत होते. त्यांना त्यांच्या पैशाचे झाड बहरताना दिसत असावे.
मी खिन्नपणे माझ्या आनंदाच्या झाडाच्या दिशेने पाहिले. रात्रीच्या अंधारात सुद्धा किती शांत आणि धीरगंभीर दिसत होते ते....... काही दिवसांनी ते इथे नसणार?.........मला एकदम गळून गेल्यासारखे झाले . एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीला अनपेक्षित पणे एखादा दुर्धर रोग झाल्याचे कळावे .... तसे मला वाटले.
“ आनंदाचे झाड पाडून, पैशाचे झाड लावू म्हणताय?” मी म्हणालो.
“ काय म्हणालात दाते साहेब ? मी नाही समजलो.” समजूतदार वर्धमानसाहेब म्हणाले.
सगळेच जुने नेस्तनाबूत करणाऱ्या वर्धमान साहेबांना ,मला काय सांगायचे होते ते समजावे अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती.
ते दोघे निघून गेल्यावर मी अस्मिताला नक्की काय घडले ते सांगितले. तिचा चेहरा एकदम कसातरी झाला. तिने माझा हात घट्ट पकडला आणि ती कापऱ्या आवाजात म्हणाली,
“ विजय ,आता आपण काय करायचं? मला काही सुचेनासे झाले आहे!”
माझी परिस्थिती काही वेगळी नव्हती. पण आम्ही दोघांनी ठरवले कि मुलांना इतक्यात काहीही सांगायचे नाही.ती रात्र अस्वस्थतेत गेली. दुसरा दिवस सुद्धा बैचेनीतच गेला. मग मी विचार केला ,जर हे प्रपोझल स्वीकारायचेच असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करायला हवा. वकिलांना दाखवायला हवे. तिसरे दिवशी ,सकाळी मी Advocate सावंत यांची त्यांना भेटायची वेळ ठरवून घेतली. दुपारी मी आणि माझे शेजारी जाधव दोघेही सावंत साहेबांना भेटायला गेलो.त्यांना आमच्या दोघांचीही प्रपोझल दाखवली. राजाराम बिल्डर्स हे नाव वाचून सावंत साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या.तरीही त्यानी दोन्ही प्रपोझाल्स वाचली. नंतर आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून हातात घेत ,त्यांनी आमच्या कडे जरावेळ न्याहाळून पाहीले. बोलावे किवा बोलू नये अश्या विचारांनी ते थोडा वेळ थांबले. मग कसला तरी निश्चय करून म्हणाले,
“ दाते साहेब ,जाधव साहेब ,प्रपोझल चांगले आहे. किमत सुद्धा मार्केट पेक्षा जास्त आहे. पण तुम्ही माझे जुने मित्र आहात.या बिल्डर बद्दल चारचौघात मत काही चांगले नाही. या वर्धमान विरुद्ध बऱ्याच केसेस आहेत.लोकांच्या जमिनी लाटणे ,फसवाफसवी ,खंडणी उकळणे, काही खुनांचे सुद्धा आरोप आहेत.राजकीय संगमनाताने हा अजून मोकळा फिरतोय पण मला वाटते तुम्ही या माणसापासून लांब राहावे हे उत्तम !”
“ अहो सावंत साहेब पण इतके चांगले प्रपोझल कसे परत मिळणार?” जाधव म्हणाले.
“ तुमची जागा मोक्याची आहे. एखादा चांगला बिल्डर बघा. याचा नाद सोडा !”
“ ठीक आहे ,आम्ही विचार करतो. तरीही या प्रपोझल मध्ये काही बदल हवे आहेत का? कायद्याच्या दृष्टीतून हे सांगितले तर बरे होईल.” मी म्हणालो. मी तरी यांना काय सांगणार होतो? हे प्रपोझल स्वीकारणे मला भाग होते,हे मी त्यांना सांगू शकत नव्हतो.
“ उद्या संध्याकाळ पर्यंत मी माझी नोट तयार ठेवतो.कुणालातरी पाठवून द्या.” सावंत साहेबांनी सांगितले.
“ तुमच्या सल्ल्याबद्दल आभार !” असे सांगून आम्ही बाहेर पडलो.
जाधव त्यांच्या गाडीकडे गेले आणि मी माझ्या गाडीकडे निघालो.इतक्यात माझा मोबाईल वाजला. अस्मिताचा फोन होता.ती एकदम उत्तेजित झाली होती.
“ विजय ! विजय ! टीवीवर ब्रेंकिंग न्यूज दाखवतायत ! वर्धमान साहेबांचा त्यांच्या ऑफिससमोर खून झालाय..... ते बाहेर येत होते तेव्हा दोन हेल्मेटधारी इसम मोटारसायकल वरून आले,आणि त्यांनी गोळीबार केला.वर्धमान साहेब जागीच ठार झाले!.... सारखी ही बातमी दाखवत आहेत......पूर्व वैमनस्यातून हे झाले असे पोलिसांना वाटते म्हणे......”
अस्मिता असे बरेच काही तरी सांगत होती. ...मी घरी निघालोच आहे असे सांगून मी फोन बंद केला. क्षणभर मी सुन्न झालो. कुणाच्या मृत्यूनंतर आनंद होऊ नये असे म्हणतात.......
पण..... मला आनंद झाला. आणि मला त्याची लाज वाटली नाही.....
मला तिथेच रस्त्यावर नाच करावा असे वाटले. मी स्वतःला सावरले. ...परमेश्वराचे आभार मानले.
एका सभ्य माणसाचा बंगला वाचला... माझे आनंदाचे झाड वाचले.... अगदी मरता मरता वाचले......
सध्यातरी !...........काही काळापुरतेतरी.......
***********************************************************************************

सुवासिनी मासिकाच्या फेब्रुवारी २०१९ च्या अंकात ही कथा प्रसिद्ध झाली आहे.
Interesting.....
ReplyDeletesaadhi, soppi, saral, saatvik aani sundar goshta
nice
ReplyDelete